टिप्स मराठीनं एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. २०२० या वर्षातलं सर्वात रोमँटिक असं मराठी गाण ‘काजळात ह्यो’ हे गाणं नुकतंच युट्यूबवर लॉन्च करण्यात आलं.

नात्यांमधला विश्वास आणि प्रेम या गाण्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोणचवण्याचा प्रयत्न या गाण्याच्या माध्यतून गेला गेलाय. प्रेम हे मातीच्या सुगंधाप्रमाणं नेहमी दरवळत राहाते आणि ते व्यक्त करण्यासाठी दोन हृदयांमधील झालेला संवाद या गाण्याच्या स्वरूपातून मांडलेला आहे. अर्थपूर्ण आणि रोमँटिक गाणं प्रेक्षकांना देखील आवडलं असून काही तासांतच गाण्याला ६ लाखांच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.